खेड पोलीस स्थानकातील टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट

खेड : खेड पोलीस स्थानकात लोकसहभागातून सुरू असलेली अंतर्गत कामे अंतिम टप्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकातील टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली. यात बहुतांशी संगणकीय उपकरणांचा समावेश होता. गेल्या २० दिवसांपासून खेड पोलीस ठाण्याला नवा साज देण्यासाठी रंगरंगोटीसह अनेक कामे सुरू आहेत. सभोवतालचा परिसरही चकाचक करण्यात आला.

तसेच पोलीस स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 04/Mar/2025