माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन-करजुवे हा मुख्य रहदारीचा मार्ग आहे. या मार्गाची सध्या खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, वाहनधारकांसह दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर रस्त्याच्या बाजूची मोठी झाडे मातीसह घसरून रस्त्यावर आल्याने रहादारीला अडथळा निर्माण होतो. विवेक शहाणे यांच्या घराजवळ, पेढांबे स्टॉप, धामापूर रामाणेवाडी आदी ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे भरण्यासाठी चिरा आणला आहे. मात्र आज ही तो तसाच पडून राहिला आहे. जांगलदेव मंदिराजवळ रस्त्याची एक बाजू तुटून गेली असून रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात घडू शकतो. अनेक ठिकाणी रस्त्याची साईडपट्टी खचल्याने खड्डे तयार झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 04/Oct/2024