चिपळूण नगर परिषद, चिपळूण माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत सायकल दिवस उपक्रम

चिपळूण : महाराष्ट्र शासन- माझी वसुंधरा अभियान ५.० हे चिपळूण नगर परिषदे मार्फत शहरामध्ये राबवित आहोत. त्या अनुषगाने माझी वसुंधरा अभियान ५.० च्या प्रभावी अमंलबजावणी करिता कृती बिंदू वायू मधील इंडीकेटर नुसार नागरिकांमध्ये सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नूतन वर्षाच्या प्रारंभाकरिता चिपळूण नगर परिषदेचे मुध्याधिकारी विशाल भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या ०१ तारखेला खाजगी वाहनाने न येता सायकल किंवा पायो येऊन सायकल दिवस हा उपक्रम राबविणेत येतो.

यानुसार ०१ मार्च वरोजी सकाळी ८.०० वाजता उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सुरुवातीस स्ट्रावा एप्लिकेशन वरुन आपले चिपळूण नगर परिषद क्लब जॉईन करुन या उपक्रमात सहभागी होण्यास आव्हान करण्यात आले. त्यानंतर आरोग्य निरिक्षक सुजित जाधव यांनी माझी वसुंधरा अभियाना अतंर्गत या उपक्रमाची माहिती दिली आणि सूत्रसंचालन केले.

त्यानंतर या उपक्रमाबाबत प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी प्रास्ताविक मधून सविस्तर माहिती दिली. यानंतर चिपळूण शहरामधील गेली अनेक वर्षे कोणत्याही वाहनाचा उपयोग न करता आपले दैनंदिन कामकाज सायकल वापरुन करित असलेल्या तीन नागरिकांचे प्राथनिधिक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

चिपळूण नगर परिषद कर्मचारी किशोर तांबे यांचा सन्मान दिलिप आंबे, हेमंत भोसले यांचा सन्मान अशोक भुस्कूटे, दिलिप आंबे यांचा सन्मान हर्षद शेख, चिपळूण नगर परिषद सेवा तत्वावरील कर्मचारी विलास कृष्णा जाधव यांचा सन्मान प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर नेहमीच आपला दैनंदिन कामकाज जास्तीत जास्त पायी चालून करित असलेले अनिल पुरुषोत्तम हटकर यांचा सन्मान श्री. मंगेश पेढांबकर, संतोष एकनाथ ढवण यांचा सन्मान प्रभाकर सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर सर्व उपस्थित मधील सायकल धारकांनी चिपळूण नगर परिषद कार्यालयातून खंड बायपास रोड ते पागनाका हायवे ते भोगाळे, चिंचनाका मार्गे चिपळूण नगर परिषद कार्यालय येथे सांगता करण्यात आली. तसेच सदर मार्गे इतर सर्व नागरिकांनी पायी चालून सदरच्या उपक्रमात सहभाग घेऊन आपली उपस्थिती नोंदवली.

या उपक्रमाला चिपळूण शहरातील ९०-१०० सायकलस्वार तसेच अन्य नागरिक व कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी संपन्न केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 04-03-2025