राजापूर : तुळसुंदे येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मंगळवार ३ मार्च रोजी दुपारी २ वा. सुमारास घडली. हरिश्चंद्र भगवान आंबेरकर (वय ४८, रा. तुळसुंदे, राजापूर) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. २४ फेब्रुवारी रोजी ते घरी असताना त्यांना चक्कर येउन ते पडले होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी चर्मालय येथील मल्टिस्पेशालिस्ट दवाखान्यात त्यांना दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता ३ मार्च रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 05/Mar/2025