चिपळूण : डी.बी.जे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुंबई-गोवा महामार्गानजिक स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी रेडीज पेट्रोल पंप ते चिपळूण बसस्थानक या परिसरातील महामार्गावरील प्लास्टिक संकलन केले.
या स्वच्छता मोहिमेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या रासेयो विभाग, वरिष्ठ महाविद्यालय रासेयो विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. उत्तमराव सूर्यवंशी, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट मधुसूदन माने, कॅ. नम्रता माने उपस्थित होते.
या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. चेतन आठवले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 04/Oct/2024