कोणतीही जात मंदिराच्या मालकीचा दावा करु शकत नाही : मद्रास हायकोर्ट

चेन्नई : मद्रास हायकोर्टानं एका प्रकरणात भारतीय संविधानानुसार कोणतीही जात मंदिराचा मालकीच्या दावा किंवा मंदिराचं व्यवस्थापन जातीच्या ओळखीच्या आधारावर करु शकत नाही, असं निरीक्षण नोंदवलं.

मद्रास हायकोर्टानं सी गनेसन विरुद्ध आयुक्त, एचआर अँड सीई विभाग या प्रकरणात नोंदवलं.

न्या. भरत चक्रवर्ती यांनी म्हटलं की जातीच्या नावानं ओळख सांगणाऱ्या सामाजिक गटांना पारंपारिक पूजा पद्धती राबवण्याचा अधिकार असू शकतो. मात्र, जात ही धार्मिक संप्रदाय होऊ शकत नाही.

जातीभेदावर आधारित अन्यायावर विश्वास ठेवणारे लोक धार्मिक संप्रदायाच्या नावाखाली असमानता लपवण्याचा प्रयत्न करतात, आणि मंदिराकडे सामाजिक अस्वस्थता आणि विभाजनकारी प्रवृ्त्ती सुपीक जमीन म्हणून पाहतात. भारतीय संविधानाच्या कलम 25 आणि 26 नुसार आवश्यक धार्मिक उपासणांचं आणि आणि धार्मिक संप्रदायाचा अधिकार मान्य करतात. कोणतीही जात मंदिराच्या मालकीवर दावा करु शकत नाही. मंदिराचं व्यवस्थापन जातीच्या ओळखीच्या आधारे करणं ही धार्मिक उपासना असू शकत नाही, असं कोर्टानं म्हटलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 05-03-2025