खेडमधील तीनबत्ती नाका रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य

खेड : खेड येथील तीनबत्ती नाका हा गजबजलेला परिसर असून, या रस्त्यावरून सातत्याने मोठमोठ्या वाहनांची ये-जा चालू असते. खेड दापोली रस्त्यावरील हा मुख्य मार्ग असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे तीन बत्ती नाक्यावरच खेड नगरपालिकेचे कार्यालय आहे. या परंतु याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरले तरी लगेच पुन्हा पडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी खेड नगरपरिषद प्रशासनाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पावसामुळे या खड्यात पाणी भरल्याने पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडते त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर हे खड्डेड् नगरपरिषद प्रशासनाने भरावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 04/Oct/2024