रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविण्यात आल्याचे सहआयुक्त (शिक्षण ) प्रमोद जाधव यांनी कळविले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशील भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक तपशील भरुन घेण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी, असेही कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 05-03-2025