Ratnagiri : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सज्ज; मार्गदर्शक सूचना जारी

रत्नागिरी : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत, उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जि. प. आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

सध्या उन्हाळा सुरू असून दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे व आद्रतेमुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उमाघात होण्याची शक्यता असते, जिल्ह्याचे सध्याचे तापमान हे ३५ अंश ते ३७ अंश झाले आहे. शेतमजूर आणि कामगार उन्हाची पर्वा न करता उन्हामध्ये राबतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते.

जि. प. ने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उष्माघात होण्याची कारणे : जास्त उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क योष्याने उष्माघात होऊ शकतो.

उष्माघात लक्षणे: मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, ९७% (फॅरनहाईट) पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, कृचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ. अति जोखमीच्या व्यक्ती लहान मुले, गरोदर महिला, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार आहेत.

प्रतिबंधात्मक उपाय: पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या, घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडांचा वापर करा, उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, प्रवास्सत पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीच्चा वापर नियमित करावा, अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका असण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. शक्य असल्यास घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स यांचा वापर करावा, थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

काय करू नये
उन्हात अति कष्टाची कामे करू नका, दारू, चहा, कॉफी आणि कार्बनेिटेड थंड पेये घेऊ नका, दुपारी बारा ते तीनण्या तीव्र उन्हाच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोडया वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे, उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, उष्ण्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरू नयेत, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

उपचार
रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे, रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत, रुग्ण शुद्धीवर आसल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे. चहा, कॉफी देवू नये. रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व साधारण तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. असे मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटले आहे.

उष्माघाताची लक्षणे जाणवली तर, नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुम्मालयात भरतीची गरज पडल्यास १०८ अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा, – डॉ. अनिरुद्ध आठल्ये

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 06/Mar/2025