रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा पंधरवडा या उपक्रमाची सांगता स्वच्छ सागर सुरक्षित सागर या उपक्रमाने करण्यात आली.
स्वच्छता ही सेवा अभियान १७ सप्टेंबरपासून सुरू झाले. ते संपूर्ण भारतामध्ये राबविण्यात आले. या अभियानाच्या सांगतेकरिता स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता फेरी महाविद्यालयापासून मांडवी किनारपट्टीपर्यंत काढण्यात आली. महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांनी मांडवी किनारपट्टीची स्वच्छता केली व या उपक्रमातून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हा संदेश दिला.
स्वच्छतेचा संस्कार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी स्वच्छता ही सेवा पंधवडा साजरा करण्यात आला. यात महाविद्यालय परिसर स्वच्छता, कागदी पिशव्या तयार करून त्याचे वितरण, स्वच्छताविषयक घरोघरी जनजागृती, बसस्थानक स्वच्छता, वारसा स्थळाची स्वच्छता रत्नदुर्ग किल्ला, मांडवी किनारपट्टी स्वच्छता व स्वच्छता फेरी हे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छता ही सेवा ही मोहीम सामुदायिक जबाबदारीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी आणि स्वच्छतेचा संस्कार जनमानसात रुजवण्यासाठी स्वयंसेवकांनी स्वतःहून श्रमदानात सक्रिय सहभाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.
या उपक्रमात महाविद्यालयातील एनएसएस विभागाचे सर्व स्वयंसेवक सहभागी झाले. प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. ऋतुजा भोवड व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मिथिला वाडेकर, रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर व नगरपरिषद उपमुख्याधिकारी इंद्रनील चाळके, शहर स्वच्छ्ता निरीक्षक संदेश कांबळे, हर्षवर्धन काटकर, प्रणित जाधव, नरेंद्र बनये, दिव्यस्वप्न फाउंडेशनचे ओमकार जाधव, अमर लोखंडे व इतर अधिकारी तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 04-10-2024