राजापूर : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली असून, पारा सुमारे ३७ ते ३९ अंशापर्यंत पोहचला आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, फळ भाजून गळून जात आहेत. राजापूर तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये फळगळतीचे प्रमाण अधिक आहे. तापमानवाढीने होणारी फळगळती रोखण्यासाठी झाडांना पाणी दिले जात असले तरीही कातळावरील बागांमध्ये पाण्याचे नियोजन करताना बागायतदारांना वातावरणामुळे दहा ते पंधरा टक्के नुकसान बागायतदारांना सहन करावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या वाढणाऱ्या उन्हाच्या झळा अधिकच असह्य झाल्या आहेत. त्याचा परिणाम आंबा, काजूपिकावर दिसू लागला आहे. ज्या बार्गामधील झाडांना सुरुवातीला मोहोर येऊन फळधारणा झाली आहे त्या बागांमध्ये फळे परिपक्व होऊन काढणाच्या स्थितीमध्ये झाली करण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे; मात्र त्यहिया या तयारीवर प्रतिकूल हवामानाने पाणी पेरले आहे. गेल्या काही दिवसांतील वाढत्या तापमानामध्ये अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीमध्ये तयार फळे दिसत आहेत. काही झाडाखाली फळगळती झाल्याचेही दिसत आहे. जसजसे तापमान वाढत आहे तसतसे फळगळती आणि फळ भाजण्याचे प्रमाण वाढत आहे.
वाढत्या तापमानाने होणारी फळगळती रोखण्यामागी काही शेतकरी-बागायतदार देण्यासारख्या उपाययोजना करताना दिसत आहेत. मात्र, दिवसागणिक वाढणारे तापमान आणि भविष्यात वाढते तापमान राहण्याची स्थिती पाहता किती दिवस झाडांना पाणी द्यायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
हवामानात्तील बदलांमुळे नुकसानीच्या वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच विविध कारणांमुळे आंबा काजू खर्च उत्पन्नाचे बागायतदारांच्या गणित यावर्षी बिघडलेले असतानाच तापमानवाढीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना सहन करावे लागणार आहेत.
गेल्या काही दिवसांतील वाढलेले तापमान आणि प्रतिकूल वातावरणाचा सुरू झाली आहे. गतवर्षीही वाढलेल्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम होऊन आंबा फळगळती आणि फळभाजणी झाली होती. बागायतदारांना चांगलाच आर्थिक नुकसानीचा फटका बसला होता. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वाढल्या तापमानामध्ये झालेल्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये फारसा बदल झालेला नाही. याचा सकारात्मक विचार होऊन शासनाने बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी- ओंकार प्रभूदेसाई, आंबा बागायतदार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 06/Mar/2025














