चिपळूण : वालावलकर ट्रस्टने आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या क्षेत्रात अधिक काम करावे : डॉ. अनिल काकोडकर

चिपळूण : भ.क.ल. वालावलकर ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण समाजाचे स्वावलंबन या विषयात संस्थेने केलेल्या विकासाचा आलेख कायम उंचावत राहो, अशी आशा ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयात शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. दि. २८ रोजी वालावलकर मेडिकल कॉलेजमध्ये शास्त्रीय सल्लागार समितीची १८वी बैठक झाली.

ही समिती ग्रामीण भागातील समाजाचे प्रश्न समजून घेऊन त्यासाठी वैद्यकीय प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन यावर चर्चा व मार्गदर्शन करीत असते. या समितीचे अध्यक्ष अणूशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. काकोडकर हे आहेत. समितीच्या बैठकीसाठी टाटा मेमोरियलचे अॅकॅडमी डायरेक्टर डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. रिटा मुल्हेरकर, डॉ. जयंत बांठीया, डॉ. अरविंद नातू, हैद्राबाद येथील प्रा. डॉ. महेंद्र सोनावणे, टाल्वीन कौर, बिरसेन कौर आदी उपस्थित होते.

यावेळी वालावलकर रुग्णालय आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्यातर्फे सुरू होणाऱ्या संशोधन उपक्रमाची माहिती सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी एम. डी. मेडिसीन विभागातर्फे सुरू असलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. डॉ. सुवर्णा पाटील यांनी, डेरवण कॉहॉर्टचे आणि उपक्रमांची माहिती दिली. यावेळी कोकण विभागातील किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे, रक्तातील कॉपर, झिंक, जीवनसत्त्वे, इन्सुलिन, युरिक अॅसिड, होमोसिस्टीमची पातळी अशा विषयावर डॉ. वैभव राऊत, डॉ. आशिष गायकवाड, डॉ. अनिकेत खलाडकर, डॉ. अजय पाटील, डॉ. लोचन माळंदकर, डॉ. प्रवीण बागड यांनी सादरीकरण केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 04/Oct/2024