बोरिवली – शिवतर जादा बसफेरी १३ मार्चपासून धावणार

खेड : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई व शिवतर विकास मंडळाच्या सततच्या पाठपुराव्याने १३ मार्चपासून बोरिवली – शिवतर जादा बसफेरी धावणार आहे. ही बस हंगामी स्वरूपात सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बोरिवली येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. तर शिवतर येथून सकाळी १०.१५ वाजता सुटेल. शिवतर, जामगे, आंबये, मुरडे, चाकाळे, भडगावमार्गे बोरिवलीला जाणाऱ्या बसफेरीचे ऑनलाईन आरक्षणही सुरू झाले आहे. या सेवेचा लाभघेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 06/Mar/2025