Beed Stone: बीडमध्ये आकाशातून पडले 2 दगड; खगोल अभ्यासक म्हणाले…

बीड : बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावात भिकाजी अंभोरे यांच्या पत्रावर धाडकन दोन दगड पडले. त्यातला एक दगड पत्राला छिद्र पाडून आत येऊन पडला .तर दुसरा दगड शेतकऱ्याच्या घरा शेजारच्या गायरान जागेत पडला. हा दगड पडताना खेळणाऱ्या मुलांनी पहिल्याचंही त्यांनी सांगितले .

हे कळता क्षणी तहसील प्रशासनातल्या अधिकारी गावात येऊन दगडांचा पंचनामा करून गेले .मग अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासाकांनीही गावाला भेट दिली .

अधिकाऱ्यांना आणि शास्त्रज्ञांना दगड कसा पडला हे सांगताना वडवणी गावातील मुलं प्रचंड उत्साहात मोठा आवाज झाल्याचं सांगत होते .

या अभ्यासाकांनी दगडाची पाहणी केल्यानंतर 80 सेंटीमीटर आकाराचे हे दगड उल्कापिंड असल्याचं सांगितलं .

हा सगळा आशनीपाताचा प्रकार असावा असं जाणवत असल्याचं खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सांगितलं .

या उल्कापिंडाला म्हणजे या दोन्ही दगडांना आता जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे शास्त्रज्ञ ताब्यात घेणार आहेत .

त्यांच्याकडून पुन्हा एकदा या उल्कापिंडींचे विश्लेषण करण्यात येईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल असेही सांगण्यात आलंय .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 06-03-2025