रत्नागिरी : बेदरकारपणे एसटी चालवून प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या दुसऱ्या एसटीला पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी एसटी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास पावस ते गावखडी जाणाऱ्या रस्त्यावरील कुर्धे फाटा येथे घडली.
निलेश रावण पाटील (34, मुळ रा. शिरोळ कोल्हापूर सध्या रा. राजापूर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस नाईक वैभव कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 27 फेब्रुवारी रोजी संशयित निलेश पाटील हा आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-2991) घेउन रत्नागिरी ते अणसुरे असा जात होता. तो कुर्धे स्टॉप येथे आला असता तेथे प्रवासी उतरवण्यासाठी थांबलेल्या (एमएच-14-बीटी-2229) ला एसटीला त्याने पाठीमागून धडक देत अपघात केला. यात दोन्ही एसटीचे नुकसान झाले असून 4 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 06/Mar/2025














