पासपोर्टसाठी जन्माचा दाखला आवश्यक; परराष्ट्र खात्याचा नवा नियम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्याच्या नियमात बदल केला असून यापुढे 01 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्यांचा पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्म दाखला बंधनकारक करण्यात आलाय. जन्मदाखला नसेल तर पासपोर्ट काढता येणार नाहीये.

याआधी पासपोर्ट बनवण्यासाठी ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड, वडिलांचे ड्रायविंग लायसन्स, शाळा सोडल्याचा दाखला अशी कागदपत्रे लागत होती.

परंतु आता सरकारने यात बदल केला असून केवळ जन्म दाखला वैध ठरणार आहे.

हा नवा नियम 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्मलेल्या बाळांसाठी लागू असणार आहे.

जर जन्माचा दाखला उपलब्ध नसेल तर अशा मुलांना पासपोर्टसाठी अर्ज सादर करता येणार नाही.

पासपोर्ट अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी करण्यासाठी हा नियम आणला आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

जन्म दाखला सक्तीने केल्याने कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्यास मदत होईल.

पासपोर्ट मिळवण्यासाठी ऑनलाईन किंवा जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र, जवळचे पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन अर्ज भरता येऊ शकतो.

अर्ज सादर केल्यानंतर पोलीस पडताळणी केली जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 06-03-2025