रत्नागिरी : आशा कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार

रत्नागिरी : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

आशा महिलांना दरमहा ७ तारखेच्या आत इतर कर्मचा-यांप्रमाणे ठोक मानधन दरमहा २६ हजार रुपये व गटप्रवर्तक महिलांना ३१ हजार रुपये मिळावे, गटप्रवर्तक महिलांना इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कायम नेमणूक करावी, सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना ६० वर्षांनंतर दरमहा १० हजार पेन्शन द्यावी, दरवर्षी ३ हजार बोनस मिळावा त्याचबरोबर मानधन वाढीचा निर्णय होवूनही एक वर्ष पूर्ण होत आहे; मात्र अद्याप झालेले नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाबाबत चर्चा करत असताना डॉ. आठल्ये यांनी शिष्ट मंडळाला सांगितले की, मागील तीन महिन्यांचा आशा गटप्रवर्तक महिलांचे थकीत मानधन लवकर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सीईओ नेमलेले नाहीत, त्या ठिकाणी ते नेमण्याची आमची मागणी सुरू आहे.

ऑनलाईन कामासाठी ज्या आशांचे ट्रेनिंग झालेले नसेल, त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळामध्ये शंकर पुजारी, सुमन पुजारी, पल्लवी पारकर, संजीवनी तिवरेकर, संचिता चव्हाण, तनुजा कांबळे व वृंदा विखारे आदी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 07/Mar/2025