रत्नागिरी : नाटेकर बालक मंदिरात श्लोक पठण स्पर्धा

रत्नागिरी : श्री समर्थ सेवा मंडळातर्फे मनाचे श्लोक पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त ल. ग. प. प्राथमिक विद्यामंदिर नाटेकर बालक मंदिरात स्पर्धा घेण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळाकडून रुता पंडित, अस्मिता सरदेसाई, अलका बेदरकर आणि पूर्वा खालगांवकर हे शिक्षक आले होते. त्यांचे स्वागत बालवाडी विभाग प्रमुख कामिनी महाडिक यांनी गुलाबपुष्प देऊन केले. त्यानंतर रामदास स्वामींच्या प्रतिमेला हार घालून श्लोक म्हणून झाल्यावर मनाचे श्लोक पठण स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत बालवाडी विभागातील वीस मुलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सहभागी सर्व मुलांना प्रशस्तिपत्र व बक्षीस देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 04/Oct/2024