रत्नागिरी : जिल्ह्यात उद्या महिला ग्रामसभांचे आयोजन; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान

रत्नागिरी : जागतिक महिलादिनानिमित्त पाणी व स्वच्छतेबाबत गावस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा ग्रामसभेमध्ये व तालुकास्तरावरील सभेमध्ये सन्मान करावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी केले आहे.

तसेच सर्व महिलांनी आपल्या गावासाठी सक्रिय काम करून गावे आदर्शवत बनवण्यात महत्त्वाचे योगदान द्या, असेही त्यांनी सांगितले.

महिलादिनाचे औचित्य साधून पाणी व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान, उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतीत अंमलबजावणी साहाय्य संस्था म्हणून निवड झालेले ग्रामसंघातील सर्व महिलांची जागतिक महिलादिनानिमित्त विशेष धाव (वॉश रन) आयोजित करण्यात येणार आहे.

त्यामध्ये महिला, बचतगटातील उमेद, किशोरवयीन मुली किंवा विद्यार्थिनी, स्वच्छता कर्मचारी, पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्यविषयी संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. ८ ला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींत विशेष महिला सभेचे आयोजन करून त्यात पाणी, स्वच्छता व आरोग्यसबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीविषयीचा सद्यःस्थिती कथन करावी. पथनाटय मासिक पाळी व्यवस्वापन एफटीके कीट चाचणी करावयाची आहे.

तालुकास्तरावर सत्कार सत्कार कार्यक्रम कार्य करून ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्तीसंबंधित सुयोग्य व्यवस्थापन करणारे महिला नेतृत्व, किशोरवयीन चॅम्पियन, क्षेत्रीय तपासणी संघाच्या साह्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण करावे तसेच महिलांचा मेळावा घ्या, असे निर्देश दिले आहेत, असे प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी सांगितले.

हे कार्यक्रम घ्या
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत वॉश रनचे आयोजन, महिलांचा सन्मान, ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा, स्थानिक महिला नेतृत्वासोबत गटचर्चा किंवा कथाकथन सत्रे, महिलांच्या भूमिकेविषयी पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. स्वयंसाहाय्य बचतगटाच्या नेतृत्वाखालील पाणी व स्वच्छता क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रदर्शन करणारे मेळावे घ्या, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 07/Mar/2025