आरवली : शिमगोत्सवानिमित्त रांगणेकर बंधू सामाजिक मित्र मंडळ रांगव सुतारवाडीच्यावतीने रांगव ता. संगमेश्वर येथे पालखी सोहळा व सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सभागृह उद्घाटन सोहळा, सायंकाळी ७.३० वा. वाडीतील लहान मुलांचे विविध कार्यक्रम, रात्री १०.०० वाजता सध्या गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट छावा दाखवण्यात येणार आहे. सोमवार १७ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
सायंकाळी ४ वाजता प्रियदर्शनी महिला मंडळाचा हळदीकुंकू समारंभ, रात्री ९ वाजता मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. रात्री १० वा. शाहीर पिंट्या भालेकर यांच्या आयोजनातून नमनाचा कार्यक्रम, मंगळवार १८ मार्च रोजी पालखी नृत्य स्पर्धा रात्री ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रांगणेकर बंधू सामाजिक मित्र मंडळ रांगव सुतारवाडी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 07/Mar/2025











