श्रृंगारतळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर आणि मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत भवानी सभागृह श्रृंगारतळी, पालपेणे रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुहागर विधानसभा क्षेत्रामध्ये सतत जनतेसाठी विविध उपक्रम राबवत असते, त्याचाच एक भाग म्हणून मनसे १९ वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून या लोकोपयोगी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तर्फे करण्यात आले आहे. अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये खालील तपासण्या व औषधे मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची तपासणी व आहाराबद्दल मार्गदर्शन, तसेच रक्तदाब, मधुमेह,, औषधे, इसीजी कर्करोग तपासंणी, वजन आणि आहाराबद्दल मार्गदर्शन, मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मा तसेच रक्तदान करण्यासाठी तालुक्यातील विविध समाज संघटनांचा सुद्धा सहकार्य मिळणार असून सर्व समाजातील समाज बांधव या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत.
अधिक माहितीसाठी आपण राहुल जाधव ८९७५३४८१२३ या क्रमांकावर संपर्क करू शकता गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते, की सदर शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 07/Mar/2025














