खेड : मुरडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दशरथ खामकर यांची बिनविरोध निवड

खेड : तालुक्यातील मुरडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे शिवसेनेच्या दशरथ खामकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच महादेव गोठल यांनी दिलेल्या राजीनाम्यानुसार रिक्त जागी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीनंतर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते नूतन सरपंच दशरथ खामकर यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी जि.प. सदस्य अरुण कदम, तालुका संघटक महेंद्र भोसले, उद्योजक शैलेश रुदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचपदाच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही, नूतन सरपंच दशरथ खामकर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 07/Mar/2025