मंडणगड : म्हाप्रळ येथे तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न

मंडणगड : कोणत्याही कारणाविना म्हाप्रळ येथे तलवारीने वार केल्याने वीस वर्षीय युवक जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद 7 मार्च 2025 रोजी मंडणगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्कर (वय 20 वर्ष) राहणार म्हाप्रळ हे घटनेतील पिडीत युवकांचे नाव आहे.

या घटनेसंदर्भात पिडीत युवकाने नोंदविलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार, 6 मार्च 2025 रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ येथील परेरा फार्म हाऊसला जाणारे रस्त्यावर घटनेतील आरोपीत तंजीम तौफिक मुकादम राहणार म्हाप्रळ याने नमुद वेळ व घटनास्थळी दाखल होत कोणतेही कारण नसताना फिर्यादीचे डोक्यावर दोन्ही हातांच्या पंजावर तलवारीने वार करुन तसेच हाताने मारहाण करुन फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीचे दुखापतीस कारणीभूत ठरला असे फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार आरोपीताचे विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात बी.एन.एस.109 (1) 118(2) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीस मंडणगड पोलीसांनी तातडीने ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रीया सुरु केली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 07/Mar/2025