खेड : संजय कदम यांची हकालपट्टी पक्षाने केली आहे, अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांनी शुक्रवारी (दि.७) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पदाधिकारी, युवा सेना व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच आज सायंकाळी संजय कदम यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खेड ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय कदम यांच्यावर टीका केली.
यावेळी तालुका प्रमुख भिलारे म्हणाले, संजय कदम यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. याबाबत चे पत्र पक्षाचे सचिव नेते विनायक राऊत यांनी जाहीर केले आहे. आम्ही पक्षासोबत आहोत. येत्या सर्व निवडणुका संजय कदम यांच्या विरोधात लढवल्या जातील. संजय कदम याने पक्षाशी दुसऱ्यांदा गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणीही शिवसैनिक जाणार नाही.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, महिला आघाडी अंकिता बेलोसे, बाळा खेडेकर, शहर प्रमुख शेखर पाटणे, अंकुश कदम, ज्ञानदेव निकम, अरविंद तोडकरी, मनोज भोसले, राकेश सागवेकर, हरभजन दांडेकर, प्रसाद पाटणे, चेतन वारणकर, प्रशांत खातू, मंदार शिर्के आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 08-03-2025













