रत्नागिरीत पर्यावरणपूरक पर्यटनावर चर्चासत्र

रत्नागिरी : चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांच्या रत्नागिरी उपकेंद्रात ‘पर्यावरणपूरक पर्यटन आणि संवर्धन’ या विषयावर सेमिनार आयोजित केला होता. या कार्यक्रमात पर्यावरण, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वन्यजीव रक्षक प्रा. नागेश दफ्तरदार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी निसर्ग संवर्धन आणि पर्यटन यांचा संबंध कसा असतो, यावर प्रकाश टाकला. जबाबदार पर्यटन पद्धती आणि नैसर्गिक वारसा जतन करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. पर्यटन वाढवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यातील समतोलावर त्यांनी जोर दिला. स्थानिक लोकांचा सहभाग आणि पर्यावरणपूरक
उपक्रमांची गरज त्यांनी स्पष्ट केली. यानंतर, कांदळवन क्षेत्रचे तज्ज्ञ वैभव बोंबले आणि रत्नागिरी वन विभागाचे गावडे यांनी स्थानिक पर्यावरणीय समस्या आणि संवर्धन प्रयत्नांविषयी माहिती दिली.

बोंबले यांनी कांदळवन संवर्धन आणि स्थानिक लोकांच्या उपजिविकेशी असलेला त्याचा संबंध यावर माहिती दिली. तर गावडे यांनी वन विभागाच्या माध्यमातून संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. महाराष्ट्र प्रक्षण नियंत्रण मंडळ (MPCB) क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे यांनी प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम आणि निसर्ग संवर्धनाची गरज यावर प्रभावी व्याख्यान दिले. प्लास्टिक प्रदक्षण आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम त्यांनी विशद केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 08/Mar/2025