चिपळूण : गुहागर-विजापूर रस्ता झालेल्या भागात आता रस्त्याच्या कडेला पेव्हरब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे. सती चिंचघरी परिसरात पेव्हरब्लॉक बसवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचणार नाही.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख नाका ते पिंपळीदरम्याचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला; मात्र काही वर्षांतच रस्त्याला तडे गेले. पेढांबे अवजल कालवा, पेढांबेफाटा येथे रस्त्यावर खड्डे पडले होते. तसेच काही ठिकाणी रस्ता वाहून गेला. हा रस्ता करताना शक्य तिथे पेव्हरब्लॉक बसवण्याची तरतूद अंदाजपत्रकात केली होती. रस्ता तयार झाला तरीही एजन्सीने पेव्हर ब्लॉक बसवलेले नाहीत. येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आक्षेप घेत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करणाऱ्या एजन्सीविरोधात न्यायालयात तक्रार केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली. या समितीने नुकतीच रस्त्याची पाहणी केली.
गुहागर-विजापूर राट्रीय महामार्गावर ज्या भागात सिमेंट काँक्रिटचा रस्ता होती करून घेत आहोत त्याशिवाय रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदारानेच करायची आहे. बहादूरशेख नाका ते पिंपळीदरम्यान देखभालीचे काम केले जात आहे- नजीब मुल्ला, उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 08/Mar/2025









