IND vs NZ Champions Trophy 2025 Final Match Live Streaming : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उत्साह आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या मेगा इव्हेंटच्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन वेळची चॅम्पियन टीम इंडिया आणि एक वेळची चॅम्पियन न्यूझीलंड यांच्यात एक रोमांचक सामना रंगणार आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील.
याआधी, 2000च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. मात्र, या रोमांचक सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध नवीन रणनीती आखेल आणि या मेगा स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने 2002 मध्ये (श्रीलंकेसह संयुक्तपणे) आणि 2013 मध्ये विजेतेपद जिंकले होते, तर न्यूझीलंड 2000 मध्ये विजेता ठरला होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना कधी, कुठे , किती वाजता खेळला जाईल? (India vs New Zealand ICC Champions Trophy 2025 Final Match Date, Venue, Time)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी 9 मार्च 2025 रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी दुपारी 2:00 वाजता होईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता? (IND vs NZ ICC Champions Trophy 2025 Final Match On TV)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर थेट पाहू शकता. हे हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे? (IND vs NZ Champions Trophy 2025 Final Match Live Streaming)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर पाहू शकता.
भारत आणि न्यूझीलंड संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 08-03-2025
