शिमगोत्सवासाठी दादर-रत्नागिरीच्या ६ फेऱ्या जाहीर

खेड : शिमगोत्सवासाठी कोकण मार्गावरून धावणाऱ्या होळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला आहे. शिमगोत्सवासाठी दादर-रत्नागिरी स्पेशलच्या ६ फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

११ मार्चपासून फेऱ्या धावणार असल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत शिमगोत्सवासाठी ४ होळी स्पेशल जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यात आणखी एका स्पेशलची भर पडली आहे. शिमगोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्यानंतर सीएसएमटी-मडगाव व एलटीटी-मडगाव स्पेशलच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या होत्या.

यानंतर एलटीटी-तिरुवअनंतपुरम साप्ताहिक स्पेशलच्याही ४ फेऱ्या जाहीर करत चाकरमान्यांना रेल्वे प्रशासनाने दिलासा दिला होता. या पाठोपाठ आता वसईमार्गे धावणाऱ्या धावणार उधना मंगळूर स्पेशलच्याही तब्बत ७० फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 08/Mar/2025