खेड : तालुक्यातील चिरणी-धनगरवाडी येथील विहीर आटल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाण्यासाठी हंबरडा फोडणाऱ्या ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. येथील पंचायत समितीकडे तालुक्यातील टँकरच्या पाण्यासाठीचा पहिला अर्ज दाखल झाला आहे.
देवसडेतील २ वाड्यांमध्ये तालुक्यातील पहिला टैंकर धावण्याची शक्यता असतानाच चिरणी-धनगरवाडीची भर पडली आहे. गतवर्षी तालुक्यात ८ एप्रिलपासून देसवडेतील वाड्यांमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावला होता. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने कहर केला आहे. उपलब्ध जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यातच पाण्याचा टँकर धावेल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. त्यानुसार दोनच दिवसांपूर्वी चिरणी-धनगरवाडीतील ग्रामस्थांचा टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्जही दाखल केला आहे. येथील ग्रामस्थांची तहान विहिरीतील पाण्यावर शमवली जात होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 08/Mar/2025














