रत्नागिरी : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० वा. जनशताब्दी एक्सप्रेसने (गाडी नं. १२०५१) रत्नागिरी, रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ११.३० वा. अविष्कार संस्थेच्या कार्यकारिणी समवेत बैठक (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सकाळी ११.४५ वा. वकील संघटनांसमवेत चर्चा (स्थळ : शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). दुपारी १२.०० वा. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने दांडेआडोम कडे प्रयाण. दुपारी १२.३० वा. कै. प्रविण तांबे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ : दांडे आडोम, रत्नागिरी) दुपारी १.१५ वा. कै. सोनु सखाराम आंबेकर (गांवकर) यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ : फणसवळे, रत्नागिरी) दुपारी २ वा. कै. गंगाराम तारवे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट (स्थळ : हातखंबा, रत्नागिरी) दुपारी २ ते २.३० वा. राखीव (स्थळ : पाली, ता. जि. रत्नागिरी) दुपारी ३ वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत नाणिज (नाणिज व कशेळी) येथे कुटुंब भेट. दुपारी ३.४५ वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत खानू येथे कुटुंब भेट. दुपारी ४.३० वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत साठरे भांबर येथे कुटुंब भेट. सायंकाळी ५.१५ वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पाली येथे कुटुंब भेट. सायंकाळी ६ वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत चरवेली येथे कुटुंब भेट. सायंकाळी ६.४५ वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत वेळवंड येथे कुटुंब भेट. सायंकाळी ७.३० वा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत कापडगांव येथे कुटुंब भेट. रात्रौ सोईनुसार मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 04-10-2024