राजापूर : खरवते ग्रामपंचायतीने केली पक्षी अन् प्राण्यांसाठी अन्न-पाण्याची सुविधा

राजापूर : वाढत्या उष्यामध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवत असतानाच प्राणी, पक्षी यांना अन्नासोबतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी आणि खाद्याच्या स्वतंत्र कुंड्या तसेच पाणवठे, पक्ष्यांसाठी घरटी तयार केली आहेत.

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून झालेल्या कार्यक्रमात तयार करण्यात आलेले पाणवठे ग्रामपंचायतीने पशू-पक्ष्यांसाठी खुले राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी व खाद्यपदार्थांची व्यवस्था केली आहे.

यावेळी सरपंच अभय चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी नेहा कुडाळी, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी माटल, पर्यावरण दूत भास्कर गुरसाळे, माजी सरपंच दयानंद चौगुले, दत्तात्रय उबाळे, मुख्याध्यापक विलास जाधव, शिक्षक किरण एकशिंगे, वनविभागाचे कुंभार, ग्रामपंचायत कर्मचारी देवीदास उबाळे, संजय माटल, भक्ती माटल, चैत्रा गुरव, स्त्रीरत्न बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

पाणीटंचाईच्या काळातील पशुपक्ष्यांची पाण्याअभावी होणारी बिकट स्थिती लक्षात घेऊन खरवते ग्रामपंचायतीने पाणी आणि अन्न (खाद्याची) कुंड्या तयार केल्या आहेत. तर, पक्ष्यांसाठी घरटीही तयार केली आहेत. त्यासाठी सरपंच अभय चौगुले, उपसरपंच गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, ग्रामपंचायत कर्मचारी देवीदास उबाळे, संजय माटल यांनी मेहनत घेतली. त्यांना ग्रामस्थ भास्कर गुरसाळे, दयानंद चौगुले यांनीही पक्ष्यांसाठी घरटी अन् पाणवठे तयार केले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 08/Mar/2025