रत्नागिरी : एकाने बेदरकारपणे कार चालवून पुढील कारला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५ वा. सुमारास पावस ते रत्नागिरी रस्त्यावरील फणसोप हायस्कूल समोर घडली. अक्षय सतीश सुर्यवंशी (२६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार प्रविण बंदरकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, खबर देणार प्रेम रजनीकांत पवार हे २८ फेब्रुवारी रोजी आपल्या ताब्यातील कार (एमएच ०८-एएक्स-९८३०) घेऊन रत्नागिरी ते पावस असे जात होते. ते फणसोप हायस्कुलसमोर आले असता मागून येणाऱ्या अक्षय सुर्यवंशीने आपल्या ताब्यातील कार (एमएच-१४-डीएन-३१४८) ने खबर देणार यांच्या कारला धडक देत अपघात केला. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 10/Mar/2025














