मुंबई : राज्य मंत्रिमंडळ निर्णय | राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji maharaj) आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड किल्ले आहेत.
आजही जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आणि शिवरायांच्या शौर्याची साक्ष, रक्तरंजीच लढायांचा इतिहास हे गड किल्ले सांगतात. त्यामुळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे. मात्र, यापूर्वी काही किल्ल्यांवर मद्यपान,ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. व्यसनाधी तरुणाई गड किल्ल्यांवरील मोकळ्या जागेत असेल कृत्य करतात. आता, शासनाने या कृत्याला कायदेशीर लगाम लावला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली.
विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकांचा व निर्णयांचा धडाकाच सुरू आहे. गेल्या 4 दिवसांत तब्बल 78 शासन निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. त्यात, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 41 विषयांना कॅबिनेटमध्ये मंजुरी दिलीय. त्यामध्ये, गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन केले जाणार आहे. तर, महत्वाचा निर्णय म्हणजे, गड किल्ल्यांची सुरक्षा व संवर्धन हा आहे. गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज घेतल्यास यापुढे 2 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच, राज्य सरकारने आज 41 निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार 55 वर्षे सत्ते होते
शरद पवार हे स्वत: 55 वर्षे सत्तेत असताना त्यांनी ही कृती केली नाही. आता, निवडणूक तोंडावर आल्यावर ते मागणी करतात, यातून व्यावसायिक राजकारणी ते दिसतात. नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला.
कुणी निर्देश तर दिले नाहीत ना – मुनगंटीवार
चर्चेतून प्रश्न सुटतो असं झिरवळ साहेब सभागृहात म्हणताय. पण, संविधानिक पदावर असताना असे करण्याचे कारण काय? त्यांनी उडी का मारली. निवडणूक आल्यामुळे केले असेल तर योग्य आहे. पण, हे सरकार आदिवासींच्या पाठिशी उभे आहे, असे मुनगंटीवर यांनी स्पष्ट केले. तसेच, उपाध्यक्षांनी बोलवल्यावर मुख्यमंत्र्यांना जावे लागते. निवडणूक लक्षात घेवून आंदोलन करतात. कुणी निर्देश तरी दिले नाहीत ना, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:13 04-10-2024