गावखडी ग्रामपंचायत कार्यालयातील बैठकीवरून एकाला ९ जणांकडून मारहाण

रत्नागिरी : विषय मिटवायचा होता तर मिटिंग का घेतात, असे विचारल्याच्या रागातून एकाला ९ जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास ग्रामपंचायत कार्यालय गावखडी समोर घडली. संतोष तोडणकर, आकाश तोडणकर, अक्षय तोडणकर, अनिकेत तोडणकर, ऋतिक सुर्वे, निनाद पाटील, शुभम पाटील, साईराज मयेकर, अर्जुन तोडणकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ९ संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सुगंध मधुकर पाटील (४२,रा. गावखडी, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावखडी ग्रामपंचायत कार्यालयातून मिटिंग संपवून सर्वजण बाहेर येत होते. तेव्हा फिर्यादी सुगंध पाटील हे विषय मिटवायचा होता, तर मिटिंग का घेतलात, असे मोठ्याने बोलला. याचा राग आल्याने संशयित ९ जणांनी संगनमताने फिर्यादीला लाकडी स्टंप, बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 10/Mar/2025