रत्नागिरी : समुद्रातील जोरदार वाऱ्यामुळे मागील आठवडाभर मच्छीमारी नौकांना अपेक्षित मासळी मिळालेली नाही. त्यामुळे नौका मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच फिशमिल कंपन्यांना आवश्यक मासळी पुरवठा होत नसल्याने त्यांनाही फटका बसलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडील २०२३-२४ च्या माहितीनुसार जिल्ह्यात ३१७४ सागरी मासेमारी नौका असून त्यातील २५१५ यांत्रिकी नौका आहेत. गेले चार दिवस किनारी भागात मासेमारी नौकांना गेले आठवडाभर मासळीच मिळालेली नाही. समुद्रात वारा असल्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या नौका मासेमारी न करताच बंदरात परतत आहेत.
मच्छिमार नौकांना रोजच्या खर्च वसुल होईल इतकी मासळी मिळत नसल्याने आर्थिक भार मच्छिमारांवर पडत आहे. मच्छिमार नौकांना मोठी मासळीच नव्हेतर फिशमिल कंपन्यांना लागणारी छोटी मासळीही फारच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी औद्यागिक क्षेत्रात असलेल्या फिश कंपन्यांना कच्चा माल कमी पडत आहे. फिशमिलमध्ये जाणाऱ्या मासळी कंपन्यांमध्ये कोंबडयांचे खाद्य, रंगासाठी लागणारे तेल, आदी उत्पादन केले जाते. परंतु मासळीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुने या फिशमिल कंपन्याचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामळे कंपन्यामंधील कामागार वर्गाचा पगाराच्या रक्कमेचाही भार वाढत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 10/Mar/2025














