चिपळूण : परशुराम घाटात गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी वाहने, हत्यार जप्त

चिपळूण : परशुराम घाटात समझोत्यासाठी आलेल्यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची काच फोडून मारहाण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व हत्यारे जप्त केली आहेत.

असगणी येथील तरुणाला व त्यांच्या मित्राला मारहाण केल्यानंतर गोवळकोट धक्का येथे ६ डिसेंबर २०२४ रोजी समझोता करण्यासाठी आलेल्याना परत जाताना परशुराम घाटात अडवून त्यांच्या गाडीवर हल्ला केला. तसेच त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले होती. यात मुख्य आरोपी साजीद सरगुरो व मोईन पेचकर यांच्यासह अन्य आरोपीनी अटकपूर्व जमिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हा जामीन मंजूर करताना गुन्ह्यात वापरण्यात आलेली सजीद सरगुरोची गाडी मोईब पेचकरची गाडी अशा दोन गाड्या तसेच लोखंडी साळ्या, रॉड, लाकडी दांडूके अशी हत्यारे पोलिसांनी जत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विकास निकम व त्यांच्या सहकाऱ्यानी ही कारवाई केली. तसेच या प्रकरणातील जखमी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना उपचारासाठी ५० हजार रुपये देण्याचे आदेश आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक विकास निकम करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 10/Mar/2025