आदमापूरचे बाळूमामा मंदिर १० ते १४ मार्च दरम्यान बंद

भुदरगड : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्‌गुरू संत बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव २० ते २८ मार्चदरम्यान होत आहे. त्यानिमित्त मंदिर, शिखर व भक्तनिवास, अन्नछत्र मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यासाठी १० ते १४ मार्चपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाणार आहे.

बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार असून, याची तयारी व नियोजन सुरू आहे. यामुळे मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदिरातील दर्शन सेवा बंद करावी लागणार आहे.

यामुळे चार दिवस दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून, भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देवालय समितीच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी प्रसिद्धी पत्रकाटारे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 10/Mar/2025