रत्नागिरी : दिनांक 9 मार्च 2025 रोजी रत्नागिरी पासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या साधारण ६०-६५ किमी अंतरावर असलेल्या दुर्गम अशा भागातील माचाळ या गावात लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी रक्तशर्करा तपासणी रक्तदाब तपासणी तसेच जनरल चेकअप करून देण्यात आले. चेक अप केल्यानंतर योग्य अशी औषधे तेथील ग्रामस्थांना मोफत देण्यात आली. ही सर्व औषधे MJF लायन डॉक्टर शिवानी पानवलकर, पिटर डिसुझा, FDC co, कुलस्वामी डिस्ट्रीब्युटर, आनंद फार्मा आणि लायन राहुल औरंगाबादकर यांनी स्पॉन्सर केली होती. त्यासाठी ही डॉक्टर शिवानी यांचे सहकार्य लाभले.
अंदाजे 15 ते 20 किलोमीटर च्या अंतरापर्यंत कुठलीही मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नसल्याने येथील ग्रामस्थ अनेक अडचणींचा सामना करत असतात. या तपासणी शिबिरामध्ये वयस्कर ग्रामस्थांची संख्या जास्त होती.१०० वर्षाचे एक गृहस्थ यावेळी तिथे तपासणी साठी आले होते.त्यांना खुप समाधान वाटले हे शिबिर आयोजित केल्याबद्दल.
या गावात कुठलीही मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध नसल्यामुळे होणारे परिणाम या शिबिरा च्या वेळी जाणवले.या गावापासून सुमारे १५-२० किमी पर्यंत कसलीही आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अशा ठिकाणी आयोजित केलेले हे शिबिर खूप उपयोगाचे ठरले असे उद्गार ग्रामस्थांनी लायन्स क्लब रत्नागिरीचे आभार मानत काढले.
या शिबिरासाठी क्लबच्या सर्व डॉक्टर्सचे खूपच मोलाचे सहकार्य मिळाले. रविवार असून सुद्धा सर्वजण एवढ्या लांब हे सेवा कार्य करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून या सर्व डॉक्टर्सचे आभार. यामध्ये एम. जे. एफ. लायन डॉक्टर शिवानी पानवलकर, लायन डॉक्टर सचिन पानवलकर, लायन डॉक्टर गणेश कुलकर्णी, लायन डॉक्टर माधवी कुलकर्णी, लायन डॉक्टर अमोल झोपे, लायन्स आय हॉस्पिटलचे किशोर सूर्यवंशी आणि तात्या सावंत या सर्वांचे सहकार्य लाभले.
या शिबिरासाठी या सर्व डॉक्टर्स सोबतच अध्यक्ष एम.जे.एफ. लायन गणेश धुरी, एम.जे.एफ लायन पराग पानवलकर,सचिव लायन विशाल ढोकळे, लायन साक्षी धुरी, लायन श्रेया केळकर, लायन शामल शेठ, लायन स्नेहल राणे, एम.जे.एफ.लायन सुप्रिया बेडेकर, लायन प्रदीप हरचिरकर, लायन सिरत राणे इत्यादी लायन सदस्य उपस्थित होते. या शिबिरात साधारण 35 ते 40 ग्रामस्थांची सर्व तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या आयोजनात शिपोशी गावाचे शहानावाज सरकार आणि पालू गावचे संतोष कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.सर्व डॉक्टर व लायन्स सदस्यांचे अतिशय सुंदर असे आदरातिथ्य ग्रामस्थांनी केले.मार्च महिना हा प्रांतपाल महिना म्हणून साजरा करायचा असतो आणि प्रांतपालांननी या महिन्याभरात करण्यासाठी दिलेल्या सेवा कार्यांपैकी एक विषय घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 10-03-2025












