रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपट चित्रपट गृहात प्रचंड चालत असल्याचे चित्र आहे. याच निमित्ताने आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन प्रवासाकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च, 1689 रोजी औरंगजेबाच्या कैदेत झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे सरदेसाई यांच्या वाड्यात महाराज वास्तव्याला असताना औरंगजेबाच्या सैन्याने महाराजांना पकडले आणि अत्यंत क्रूरपणे हालहाल करून ठार मारले. हा दिवस आजही संगमेश्वर कसबा येथे बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. उद्या देखील या ठिकाणी बलिदान दिवस साजरा होत असून यावेळी छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा अभिनेता विक्की कौशल उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.
विकी कौशल, रश्मिका मंदाना यांचा ‘छावा’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर जबदरस्त कमाई करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला २० दिवसांनंतरही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपट हा २०२५ मधला ५०० कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. २३व्या दिवशीदेखील ‘छावा’ चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 10-03-2025












