गुहागर : पुन्हा नव्याने नाचणी लागवडीकडे वळण्याचे व वैयक्तिक लघुउद्योग तसेच बचतगट यांच्यामार्फत प्रक्रियांकडे उद्योगात्मक दृष्टिकोनातून बघण्याचे आवाहन गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले.
पंचायत समिती गुहागर आणि ग्रामपंचायत माढाळच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व बचतगट यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ग्रामपंचायत सभागृहात केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच अंकिता चव्हाण, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी प्रतीक जाधव, कृष्णदेव कदम, मंदार जोशी, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत गोरीवले तसेच ग्रामपंचायत सदस्य व प्रगतिशील शेतकरी रवींद्र कारकर, शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रद्यान महाविद्यालय खरवते-दहिवली येथील प्राध्यापक सौ. विचारे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणात नाचणी लागवड, प्रक्रिया व उद्योग याविषयावर तसेच व्यावसायिकदृष्ट्या नाचणीपासून बनणारे पदार्थ व त्यावर आधारित लघुउद्योगाच्या संधी यावर शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रद्यान महाविद्यालय खरवते-दहिवली येथील प्राध्यापक सौ. विचारे मॅडम यांनी शेतकऱ्यांना व बचतगटांना मार्गदर्शन केले.
यावेळी गट विकास अधिकारी शेखर भिलारे व कृषी अधिकारी आर. के. धायगुडे यांचा सरपंच अंकिता चव्हाण यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी महिला बचतगटांचे सदस्य व शेतकरी आवर्जून उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:13 PM 10/Mar/2025














