पाच वर्षात होणार विक्रमी गुंतवणूक
पायाभूत सुविधांमध्ये एक हजार रुपयांची गुंतवणूक केली तर एकूण राज्य उत्पन्नामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन विमान चालक रेल्वे मेट्रो जलमार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक केली जाणार
◼️ दावोसमध्ये रोजगार निर्मिती
दावोसमधील करारातून १६ लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे – अजित पवार
वाढवण जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये असेल : अजित पवार
वाढवण जवळ मुंबईतील तिसरं विमानतळ, समृद्धी महामार्गला जोडणार, बुलेट ट्रेनला स्थानक देण्यात येईल. वाढवण जगातील पहिल्या दहा बंदरापैकी असेल.
◼️ पालघरच्या मुरबे येथे बंदर निर्मितीसाठी ४,२५९ कोटी रुपयांचा प्रकल्प खासगी क्षेत्राच्या मदतीनं उभारणार
पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर निर्मितीच्या ४ हजार २५९ कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या सहभागाने मंजूरी देण्यात आली आहे.
◼️ मुंबईतील भूयारी मार्गासाठी ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प
मुंबई उप-नगरातील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी वर्सोवा ते भाईंदर, मुलूंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह याठिकाणी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आलं आहे.
◼️ महाराष्ट्रात गुंतवणूक
राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे – अजित पवार
◼️ राज्यात औद्योगिक विकासाला गती
औद्योगिक विकासात राज्य अव्वल – अजित पवार
◼️ १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थच उद्दिष्ट
१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं सरकारच उद्दिष्ट आहे – अजित पवार
◼️ रोजगार निर्मितीसाठी सरकार सज्ज
पाच वर्षांत ५० लाख रोजगार निर्मितीच सरकारच लक्ष्य
◼️ राज्याचं औद्योगिकीकरण
महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाणार
◼️ परकीय गुंतवणुकीतून रोजगार निर्मित
परकीय गुंतवणुकीतून १६ लाख रोजगार निर्मिती होणार -अजित पवार
◼️ राज्यात वीज बिल कमी होणार
राज्यातील वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी करणार – अजित पवार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर














