चिपळूण : खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान अभियांत्रिकी विभागातर्फे कोडबिट्स ३.०’ या भव्य हॅकाथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घरडा महाविद्यालयाच्या ९००२ या ओम कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील टीमने प्रथम क्रमांक मिळवून एक लाखाचे पारितोषिक मिळवले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तांत्रिक संकल्पना विकसित करणे, विद्यार्थ्यांचे सॉफ्टवेअर कौशल्य वाढवणे आणि उद्योगांसाठी नावीन्यपूर्ण उपाय शोधणे या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील १५ महाविद्यालयांमधील ३४ गटांनी सहभाग घेतला. २४ तास चाललेल्या या हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे सादरीकरण केले. या स्पर्धेत ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग and टेक्नॉलॉजी, अथर्व कॉलेज, तृतीय कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, कोल्हापूर, तर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ वूमन, पुणे यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकास ५० हजार, तृतीयसाठी ३० हजार, चतुर्थ क्रमांकास १० हजार रुपयाने पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तारेच सर्वोत्कृष्ट १० गटांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे ई-व्हावचर देण्यात आले.
ही स्पर्धा घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. वरदा कोलगे आणि प्रा. वैशाली राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रास्ताविक प्रा. वरदा कोलगे हो यांनी केले. त्यानंतर प्रा. लाटकर यांनी कोडबिट्स’ च्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकता, यावेळी लास्ट मोमेंट ट्युशनचे संस्थापक सुमेरसिंह के. राजपुरोहित, सहसंस्थापक अद्वैत शर्मा आणि १९ वेळा वेब ३ हॅकाथॉन विजेता ठरलेले ऋषिकेश काळे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 10/Mar/2025














