मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याची कालमर्यादा वाढवली!

मुंबई : कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलत असताना महत्त्वाची घोषणा केली आहे. या योजनेच्या कालावधीस पूर्वी ६ महिने इतकी मर्यादा होती. मात्र, विधानसभा सदस्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री महोदयांनी हा कालावधी ५ महिन्यांनी वाढवून ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा एकूण कालावधी ११ महिने करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, यापुढे या कालावधीसाठी कोणतीही वाढ केली जाणार नाही. कारण ही योजना कायमस्वरूपी नोकरीसाठी नसून प्रशिक्षणपर आहे. अनेक तरुण या संधीची वाट पाहत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. तसेच, सरकारी प्रमाणपत्र मिळाल्यास प्रशिक्षित तरुणांना नोकरी मिळवणे अधिक सोपे होईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकार युवकांना कौशल्य विकास आणि प्रभावी प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 11-03-2025