रत्नागिरी : महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच एक उत्तम समाजनिर्मिती होईल. रत्नागिरीत महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, त्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी केले.

नवनिर्माण संस्थेच्या एस पी हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संस्थेच्या फिजिओथेरपी कॉलेजच्या प्रमुख ऋतुजा हेगशेट्ये, प्राचार्या डॉ आशा जगदाळे आणि प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात बदल झाला आहे. त्याचा परिणाम मुलींच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. थायरॉड, पीसिओडी, मासिक पाळी अनियमित होणं असे प्रकार वाढताना दिसत आहे. मुलींनी महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि नियमित योग्य त्या तपासण्या करणे आवश्यक आहे. मुलांची पुरुषांची मानसिकता बदलत आहे हे सकारात्मक चित्र आहे. त्यांना आपल्या सोबतच्या महिलांच्या आरोग्याविषयी आस्था असते. आणि त्या अर्थाने भविष्यकाळ उज्ज्वल आहे,’ असे ही त्या म्हणाल्या.
स्त्रियांना आजही समजत दुय्यम वागणूक मिळते म्हणूनच त्यांच्यावरील अन्यायाच्या घटना वाढत आहेत. समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, ते काम शिक्षणातून होऊ शकते असे संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये म्हणाले. प्राचार्या डॉ आशा जगदाळे यांनी आपल्या मनोगतातून टाईम या मासिकात प्रभावशाली महिलांच्या यादीतील समाविष्ट पूर्णीमादेवी बर्मन या सर्वसामान्य भारतीय महिलेची आणि आणि त्यांच्या कामाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले. प्रा. निकिता नलावडे यांनी सूत्रसंचलन केले तर प्रा. अन्विता देवळेकर यांनी आभार मानले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 11/Mar/2025














