चिपळूण : सती (ता. चिपळूण) पुलाजवळ असलेल्या सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गाच्या परिसरातील साडेतीनशे वर्षांपूर्वीची देवराई तोडण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील दर्गा परिसरात असलेली एकमेव देवराई नष्ट झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवराई म्हणजे पवित्र आणि दिव्य वन. देवराई ही भारतीय संस्कृतीतील एक धार्मिक आणि पर्यावरणीय संकल्पना आहे. देवाच्या नावाने हे पवित्र जंगल राखले जाते. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या परिसरात देवराई आहे; परंतु चिपळूण तालुक्यातील सैय्यद सैफुल्ला बाबा बांच्या दर्गा परिसरात असलेली ही कोकणातील एकमेव देवराई आहे. विशेष म्हणजे या देवराईमध्ये दुर्मिळ न्हाई आणि अर्जुन जातीची झाडे आहेत. वाशिश्रीच्या संपूर्ण खोऱ्यामध्ये अर्जुनाची बहुसंख्येने झाडे असलेली ही कोकणातील एकमेव देवराई होती. ती सुमारे साडेतीनशे ते चारशे वषाँपूत्वोंची होती. या देवराईमुळे दर्गा परिसर समृद्ध होता. दर्गाच्या परिसरात नैसर्गिक सावली तयार झाली होती.
अर्जुनची झाडे उच्च वाढलेली होती. या झाडाची साल राखाडी पांढरट असते आणि गुळगुळीत असते. त्याचा उपयोग रक्तदाब, हृदयविकार असलेल्या व्यक्तींना होतो. त्यामुळे दर्याला भेट देणारे लोक अर्जुनच्या झाडाची साल काढून प्रसाद म्हणून घेऊन जात होते. दर्गा परिसरात देवराई असताना या परिसरातील तापमान कमी होते; मात्र आता या ठिकाणची झाडे बुंध्यापासून तोडण्यात आली आहेत. त्यामुळे परिसर पूर्ण उजाड झाला आहे. पर्यावरणप्रेमी आशुतोष जोशी, मल्हार इंदुलकर, पराग वडके यांनी महाराष्ट्रातील काही वनप्रेमींबरोबर या भागाची पाहणी केली.
त्या दरम्यान त्यांना दर्गा परिसरातील तुटलेली वनराई लक्षात आली.
सती परिसरातील खासगी मालकीतील झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाने काही जागामालकांना दिली आहे. विनापरवाना तोड झाली असेल तर वनविभागाकडे तक्रार करा. आम्ही चौकशी करून कारवाई करू – शशिकांत सावंत, वनपाल चिपळूण
सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गाच्या परिसरातील साडेतीन वर्षांपूर्वीची देवराई तोडू नका. त्या झाडांची किंमत आम्ही देतो आणि या देवराईचा आम्ही सांभाळ करतो, अशी विनंती आम्ही जागामालकाला केली होती; परंतु त्यांनी ती झाडे तोडली. – मुन्ना पटाईत, सदस्य सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गा कमिटी
अर्जुनचे झाड ज्या भागात मुबलक पाणी असते तिथेच वाढते आणि अध्यात्मी साधनेसाठी महत्वाचे गणले जाते. सैय्यद सैफुल्ला बाबा दर्गाच्या परिसरातील देवराई नष्ट झाल्याचे बघितल्यानंतर मनाला खूप वेदना झाल्या. – आयुतोष जोशी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 11/Mar/2025














