रत्नागिरी : रत्नागिरी शहरात सूर्य अक्षरशः आग ओकतोय. होळी पूर्वीच वातावरणात कमालीचा बदल झालेला अनुभवायास मिळत आहे. आज दुपारी रत्नागिरीत ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुपारच्या वेळी नागरिकांना बाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा हा तडाखा जाणवू लागला आहे. यामुळे थंड पेयांची विक्रीत देखील वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. पुढील काही दिवसांत हवेच्या दाबात चढ-उतार होणार असून, त्यामुळे कमाल आणि किमान तापमान वाढणार आहे. आठवडाअखेर उष्णतेची तीव्रता जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहावे.
फेब्रुवारी महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याचं समोर आलं आहे. यावर्षी मार्च महिन्यात तापमानात मोठी वाढ होऊन 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा अनेक जिल्ह्यांमध्ये पसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे अति उष्ण तापमानाच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्यतो घराबाहेर पडू नये, असं आवाहनही हवामान विभागाने नागरिकांना केलं आहे.
राज्यात कोणत्या जिल्ह्यांना बसणार उन्हाचे चटके?
पालघर जिल्ह्यात काल शनिवारी कोरड्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. पालघरमध्येही कोरडं हवामान नोंदवण्यात आलं होतं. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली होती. दरम्यान आजही या ठिकाणी म्हणजेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये उष्ण आणि दमट हवामान असणार आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने ट्वीटरवर दिलीय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 11-03-2025













