रत्नागिरी : प्रचंड उकाड्याने विजेची मागणी वाढली

रत्नागिरी : गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली असली तरी वीजपुरवठा अखंडित सुरू आहे. तांत्रिक बिघाड उद्भवल्यास दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवला जात असला तरी जिल्ह्यात भारनियमन नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

दर सोमवारी वीज वहिन्यांची दुरुस्तींची कामे हाती घेण्यात येत असल्याने त्या दिवशी वीज पुरवठा काही वेळ बंद असतो. मात्र याची पुर्वसूचना दिली जाते. याशिवाय अन्य दिवसात नादुरस्तीमुळे वीज पुरवठा खंडीत होत असतो. परंतु भारनियमन नसल्यामुळे ग्राहकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात महावितरण सक्षम असल्यामुळे भारनियमन करण्याचा प्रश्नच नाही. भारनियमनाबाबत ग्राहकांना पूर्वसूचना करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून सांगितले. रत्नागिरी शहरात अद्याप तरी भारनियमन नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तांत्रिक बिघाड झाल्यास दुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद केला जातो. अलिकडे मार्च महिन्यात उकाडा असह्य होत आहे. मे अखेरपर्यंत हा उकाडा वाढणार आहे. वीज वापर वाढल्यामुळे वाढीव रक्कमेची बिले भरताना घाम फुटणार आहे. दिवसेंदिवस उकाडा वाढत असल्यामुळे कार्यालये, घरातील फॅन, कूलरचा वापर वाढलेला आहे. थंड वाऱ्यासाठी रात्रंदिवस वापर होतो.

वीज गळती कमी
फिडरनिहाय भारनियमन करण्याची सूचना आहे. परंतु त्या फिडवरवर वीज गळती अधिक व थकबाकीचे प्रमाण जास्त असणाऱ्या फिडवरवर प्रथम भारनियमन केले जाते. मात्र अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरीत वीज गळती व थकबाकीचे प्रमाण कमी असल्याने भारनियमन होत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 11/Mar/2025