रोहे : होळी सणानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि आरामदायी व्हावा, यासाठी मध्य रेल्वे प्रमुख मार्गांवर अतिरिक्त ३४ होळी विशेष ट्रेन सोडणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ट्रेन गाडी क्रमांक (०११०३) (४ फेऱ्या), १७.०३.२०२५ आणि २४.०३.२०२५ रोजी सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक (०११०४) ही विशेष ट्रेन १६.०३.२०२५ आणि २३.०३.२०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता मडगाव येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.
पनवेल-मडगाव अशा विशेष ४ फेऱ्या होणार असून गाडी क्रमांक (०११०१) ही विशेष ट्रेन पनवेल येथून १५.०३.२०२५ आणि २२.०३.२०२५ रोजी सांयकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक क्रमांक (०११०२) ही विशेष ट्रेन मडगाव येथून १५.०३.२०२५ आणि २२.०३.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.
पनवेल- चिपळूण-पनवेल अनारक्षित विशेष (८ फेऱ्या) गाडी क्रमांक (०१०१७) अनारक्षित विशेष पनवेल येथून १३.०३.२०२५ ते १६.०३.२०२५ पर्यंत २१.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०२.०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. गाडी क्रमांक (०१०१८) अनारक्षित विशेष चिपळूण येथून १३.०३.२०२५ ते १६.०३.२०२५ दरम्यान १५.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.४५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीला सोमटने, आपटा, जीते, पेण, कासू, नागोठाई, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवांखावती, कळंबनी बुद्रुक, खेड आणि अंजणी हे थांबे देण्यात आले आहेत. या गाड्यांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रमांक (०१०१३) ही विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.०३.२०२५ रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता बनारस येथे पोहोचेल. गाडी क्रमांक (०१०१४) ही विशेष ट्रेन बनारस येथून १५.०३.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रं. (०१०१५) ही विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.०३.२०२५ रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मऊ येथे पोहोचेल. गाडी क्रं. (०१०१६) ही विशेष ट्रेन मऊ येथून १४.०३.२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ००.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रं. (०११०११) ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.०३.२०२५ रोजी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता दानापुर येथे पोहोचेल. गाडी क्रं.(०१०१२) ही विशेष ट्रेन दानापुर येथून ११.०३.२०५ रोजी २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
पुणे-दानापुर-पुणे विशेष (२ फेऱ्या) गाडी क्रं (०१४१९) विशेष ट्रेन पुणे येथून ११.०३.२०२५ रोजी १९:५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०४.३० वाजता दानापुर येथे पोहोचेल. गाडी क्र.(०१४२०) ही विशेष ट्रेन दानापुर येथून १३.०३.२०२५ रोजी ०६:३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७:३५ वाजता पोहोचेल. पुणे – मालदा टाउन विशेष ट्रेन (२ फेऱ्या) गाडी क्रं (०३४२६) विशेष ट्रेन पुणे येथून २३.०३.२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १६.३० वाजता मालदा टाउन येथे पोहोचेल. गाडी क्रं (०३४२५) ही विशेष ट्रेन मालदा टाउन येथून २१.०३.२०२५ रोजी १७.३० वाजता आणि तिसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
हडपसर-हिसार विशेष ट्रेन (४ फेऱ्या) गाडी क्रं (०४७२६) ही विशेष ट्रेन हडपसर येथून १०.०३.२०२५ आणि १७.०३.२०२५ रोजी १७.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.२५ वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी क्रं (०४७२५) ही विशेष ट्रेन हिसार येथून ०९.०३.२०२५ आणि १६.०३.२०२५ रोजी ०५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता हडपसर येथे पोहोचेल. कलबुर्गी- सर एम विश्वसरया टर्मिनल बेंगळुरू विशेष – (४ फेऱ्या) गाडी क्रं (०६५२०) ही विशेष ट्रेन कलबुर्गी येथून १४.०३.२०२५ आणि १५.०३.२०२५ रोजी ०९.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.०० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. गाडी क्रं (०६५१९) ही विशेष ट्रेन बेंगळुरू येथून १३.०३.३०२५ आणि १४.०३.२०२५ रोजी रात्री २१.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल. या विशेष ट्रेनच्या वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. असे मध्य रेल्वेच्यावतीने प्रवासांसाठी आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:20 11-03-2025














