राजापूर आगारात ४ नवीन एसटी बसचे लोकार्पण

राजापूर : राजापूर आगाराला मिळालेल्या चार नवीन बसचा लोकार्पण सोहळा रविवारी दुपारी राजापूर-लांजा-साखरपाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यंत्रअभियंता रत्नागिरी विभागाचे अनंत कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव राजापूर आगार व्यवस्थापक अजितकुमार गोरसाळे, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले, भाजपा नेते महादेव गोठणकर, माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रकाश कुवळेकर, उमेश पराडकर, अशपाक हाजू यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 12/Mar/2025