रत्नागिरी : कोळंबे येथील सावंत क्रीडांगणावर २१ ते ३१ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय श्री जय भैरव चषक खुली टी-२० सोझन बॉल क्रिकेट स्पर्धा (कै.) छोटू देसाई अॅकॅडमीतर्फे आयोजित केली आहे.
ही स्पर्धा बाद पद्धतीने खेळवली जाणार असून, प्रथम प्रवेश घेणाऱ्या २० संघांनाच त्यामध्ये सहभाग घेता येईल. या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये ५० हजार, आकर्षक चपक व उपविजेत्या संघाला ३० हजार रुपये, आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी स्पर्धा समिती नेमण्यात आली असून, त्यामध्ये अमित लांजेकर, लाल्या खातू, हरीश लाडे, रमेश कसबेकर, श्रद्धानंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा बाद पद्धतीची आहे. या स्पर्धेत संघांनी आपली नावे पार्थ गांधी, साईप्रसाद हेरम यांच्याकडे रविवार (ता. १६) पर्यंत नोंदवणे आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 12/Mar/2025














